Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांच्या तुलनेत ‘कोरोना’मुक्त होणार्‍यांची संख्या तिप्पट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे (Corona in Mumbai) रुग्ण सर्वाधिक आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता ही रुग्ण संख्या कमी झाली आहे. आज मुंबईची रुग्णसंख्या (Corona in Mumbai) 10 हजारांच्या आत आली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 7,895 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर जवळपास तीनपटीने अधिक म्हणजे 21 हजार 025 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी 7 हजार 895 नवे रुग्ण आढळून (Corona in Mumbai) आले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 457 झाली आहे. तर 21 हजार 025 रुग्ण बरे झाल्याने मुंबईचा रिकव्हरी रेट (Recovery rate) वाढून 92 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आज आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 688 रुग्ण रुग्णालयात असून इतर घरुन उपचार घेत आहेत.
84 टक्के रुग्णांना म्हणजे 6632 रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत.
ज्यामुळे महापालिकेकडे 38 हजार 127 खाटांपैकी 5 हजार 722 खाटाच केवळ वापरल्या जात आहेत.
याशिवाय सद्यस्थितीला मुंबईतील 54 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
सध्या मुंबईत 60 हजार 371 सक्रीय रुग्ण (Active Patient) आहेत.

 

Web Title :- Corona in Mumbai | Great relief to Mumbaikars The number of corona survivors is three times higher than the number of new victims BMC Corona News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा