पूर्व हवेलीत कोरोना पुन्हा डोकेवर काढतोय, त्रिसूत्रीची अंमलबजावणी आवश्यक

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – हवेलीत पूर्व भागात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून कोलवडीत नाशिकहुन परतलेल्या दिंडीतील आठ जणांची चाचणी पॉजिटीव्ह आल्याचे समजते आहे त्यामुळे धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांना धोका वाढल्याचे स्पष्ट होते तर गेल्या दीड दोन महिन्यांत कोरोनाचे सावट कमी होत असल्याने बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांची धडधड वाढली आहे परंतु नागरिकांचे मास्क वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष होत आहे.

गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचे भारतात आगमन झाले त्यानंतर देशात नव्हे तर सम्पूर्ण जगात कोरोना पसरला लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परंतु दिवाळीच्या दरम्यान लॉकडाऊन मध्ये शिथिलता आली आणि सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. शासनाने नागरिकांना त्रिसूत्री अवलंबण्याचा सल्ला दिला परंतु नागरिकांची बेजबाबदारी वाढली परिणामी गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत.

हवेलीत गेल्या आठवड्यातच आठवडे बाजार चालू झाले आहेत अनेक महिन्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असताना पुन्हा कोरोनाचा शिरकाव होत असल्याने नागरिकांत भीती व्यक्त होताना दिसते. तरीही बहुतेक ठिकाणी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात शासनाने मंदिर उघडे करताना काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या परंतु अलीकडे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गावात दुकानदार व्यावसायिक ग्रामस्थ कोणीही मस्कचा उपयोग करत नाहीत त्यामुळे एखाद्या बाधिताच्या संपर्कात कोणी आल्यावर येथे परस्थिती बिघण्याची भीती आहे.

सध्या पूर्व भागातील वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ६० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत यात गेल्या तीन दिवसात कोलवडीत ८ कोरोना पॉजिटिव रुग्ण आहेत ही सर्व नाशिक येथील तीर्थ यात्रेवरून परतलेले आहेत यावरून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होत आहे त्यामुळे नियमांचे पालन सक्तीने करण्यात यावे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४ जण संक्रमित आहेत. तर कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४ रुग्ण अशी परिस्थिती आहे