IT Refund | प्राप्तीकर विभागाने 9 ऑगस्टपर्यंत करदात्यांना पाठवले 47318 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IT Refund | प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) ने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 9 ऑगस्टपर्यंत 22.61 लाखापेक्षा जास्त करदात्यांना 47,318 कोटी रुपयोपक्षा जास्त रक्कमेचा परतावा केला आहे. हे आकडे 1 एप्रिल 2021 पासून 9 ऑगस्ट 2021 च्या दरम्यान जारी परताव्याचे (IT Refund) आहेत. यापैकी वैयक्तिक प्राप्तीकर परतावा 114,241 कोटी रुपये होता, तर कंपनी कराचा परतावा 33,078 कोटी रुपये होता.

प्राप्तीकर विभागाने ट्विट करत म्हटले की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 पासून 9 ऑगस्ट 2021 च्या दरम्यान 22.61 लाखापेक्षा जास्त करदात्यांना 47,318 कोटी रुपये परत केले आहेत. यामध्ये 21,38,375 व्यक्तिगत करदात्यांना 14,241 कोटी रुपये आणि कंपनी कर अंतर्गत 1,22,511 विभागांना 33,078 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.

मागील आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये प्राप्तीकर विभागाने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा कर परतावा जारी केला होता. हा आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जारी 1.83 लाख कोटी रुपयांच्या परताव्यापेक्षा 43.2 टक्के जास्त होता.

यापूर्वी प्राप्तीकर विभागाने म्हटले होते की,
ते सॉफ्टवेयरमध्ये गडबड असल्याने 2020-21 चा परतावा भरताना करदात्यांकडून घेतलेले व्याज आणि विलंब शुल्क ते परत करतील.
महामारीमध्ये मागील आर्थिक वर्षाचा प्राप्तीकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 वरून वाढवून 30 सप्टेंबर 2021 केली आहे.
मात्र, काही करदात्यांनी ही तक्रार केली होती की 31 जुलै 2021 च्यानंतर भरलेल्या
प्राप्तीकर परताव्यावर त्यांच्याकडून व्याज आणि विलंब शुल्क वसूल करण्यात आले.

Web Title :-  IT Refund | income tax department issues i t refund worth rs 47318 crore cbdt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court | नव्या ‘आयटी’ नियमांसंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Delivery Scam on WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झालंय डिलिव्हरी ‘स्कॅम’, एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट; जाणून घ्या

Facebook Friend | लग्नाचा प्रस्ताव फेटाळला तर फेसबुक फ्रेंडने ‘गावभर’ लावली तरूणीची पोस्टर्स, गुन्हा दाखल