Coronavirus : मशिदीत जमा होऊन केले नियमांचे उल्लंघन, 52 जणांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना विषाणूचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनीही अनेक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील एका मशिदीत कोरोना कालावधीत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील एका गावातून 52 जणांना अटक करण्यात आली. सर्व लोक शुक्रवारच्या नमाजसाठी मशिदीत जमले होते. कोविड – 19 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 52 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध लागू केले आहेत. यावेळी मोठ्या सभांनाही बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत मशिदीत मोठ्या मेळाव्यासाठी आयोजित केलेल्या लोकांच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले, ज्यांनंतर 52 लोकांना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी एसएचओ यशपाल धामा यांनी सांगितले की, राज्यात धार्मिक स्थळांवर पाचपेक्षा जास्त लोक जमा झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले. ही घटना कैराना येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एसएचओने सांगितले. मात्र, नंतर सर्व लोकांना जामिनावर सोडण्यात आले.