Coronavirus : 24 लोकांची चाचणी केल्यानंतर एकाची टेस्ट ‘पॉझिटिव्ह’ येतीय, ‘कोरोना’बद्दल ICMR नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : विरोधी पक्ष सरकारवर कोरोना विषाणूची चाचणी वाढवण्यासाठी दबाव आणत आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी कोरोनाची चाचणी वाढविण्याची मागणी केली. ते म्हणाले की, कोरोनाला पराभूत करण्यासाठी टेस्टची संख्या वाढवावी लागेल आणि व्हायरसच्या पुढे राहून काम करावे लागेल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आता चाचण्यांची संख्या वाढविण्याबाबबत उत्तर दिले आहे. आयसीएमआरचे वैज्ञानिक रमण गंगाखेडकर म्हणाले की, आम्ही कोरोनाच्या एका सकारात्मक प्रकरणासाठी 24 जणांची तपासणी करीत आहोत. हे स्पष्ट आहे की, त्यामधील 23 जणांच्या कोरोनाचा चाचणी अहवाल नकारात्मक आहे, परंतु तरीही आम्ही त्याची चाचणी घेत आहोत.

रमन गंगाखेडकर म्हणाले की, जपानमध्ये 11.7 लोकांची सकारात्मक चाचणी घेण्यात आली आहे, अमेरिकेत हे प्रमाण 5.3 आणि ब्रिटनमध्ये 3.4 आहे, तर भारत एका सकारात्मक प्रकरणात 24 जणांची चाचणी घेत आहे. दरम्यान, गुरुवारी पत्रकार परिषद दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारला चाचणी वाढवण्यास सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, सरकारला चाचणीसाठी धोरण आखले पाहिजे, जेणेकरून कोठेही कोरोना संक्रमित व्यक्ती वाचणार नाही.

आतापर्यंत 2 लाख 90 हजाराहून अधिक चाचण्या
आयसीएमआरचे वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अँटीबॉडी चाचणी प्रत्येक क्षेत्रात वापरण्याचा उपयोग नाही. याचा फायदा फक्त हॉटस्पॉट्समध्येच होईल. आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या 2 लाख 90 हजाराहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी बुधवारी 30,043 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी आयसीएमआर लॅबमध्ये 26,331 आणि खासगी लॅबमध्ये 3,712 चाचण्या घेण्यात आल्या. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे 8 आठवड्यांसाठी चाचणी करण्यासाठी किट उपलब्ध आहे.

24 तासांत 37 लोकांचा मृत्यू
त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य सेवेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, ज्यामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 1489 लोक बरे झाले आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर 183 रुग्ण बरे झाले असून 24 तासांत, 941 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. लव अग्रवाल यांनी सांगितले की, असे 325 जिल्हे आहेत जिथे कोणतेही प्रकरण नाही. भारतात कोरोनामुळे बरे होणाऱ्यांची संख्या 12 टक्के आहे.