Coronavirus : मध्य प्रदेशात कोरोनाचा पहिला बळी, देशातील मृत्यूचा आकडा 10 वर, दिल्लीमध्ये 5 नवे रूग्ण

वृत्तसंस्था – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आतापर्यंत 605 कम्फर्म केस आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळं 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून ही घटना मध्य प्रदेशात घडली आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत वाढ होवुन तो आकडा 10 वर पोहचला आहे. कोरोना या महामारीनं आतापर्यंत 10 जणांचे प्राण घेतले आहेत. दरम्यान, दिल्लीत कोरोनाचे 5 नवे रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळं महाराष्ट्र आणि केरळ सर्वाधिक प्राभवित झाले असून महाराष्ट्रात 112 तर केरळमध्ये 105 कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. 14 एप्रिल पर्यंत देश लॉकडाऊन असणार आहे. सर्व खासगी कार्यालये, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवस कोणालाही घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. केवळ जीवनावश्यक सेवा चालू राहतील असं देखील पंतप्रधानांनी सांगितलं होतं.