Coronavirus : कोरोनाची दहशत ! डोनाल्ड ट्रम्पपासून ते प्रिन्स चार्ल्सपर्यंत जगातील नेत्यांकडून फक्त ‘नमस्ते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची भीती जगभरात इतकी वाढली आहे की, आता मोठे नेतेही हात मिळवणी करण्याऐवजी भारतीय संस्कृतीचे साहाय्य घेत एकमेकांना नमस्ते करीत आहेत. याचे नुकतेच एक उदाहरण समोर आले असून डोनाल्ड ट्रम्पपासून ते प्रिन्स चार्ल्स यांच्यापर्यंत सर्वजण नमस्ते करताना दिसत आहेत. दरम्यान गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये वॉशिंग्टनच्या यात्रेवर असलेले आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते एकमेकांना नमस्कार करताना दिसले. तेथे उपस्थित भारतीय वंशाच्या वराडकर यांनी हात जोडून नमस्कार केला आणि पत्रकारांना दाखविले कि त्यांने कसे राष्ट्रपतींचे अभिवादन केले. यानंतर ट्रम्प यांनीही हात जोडून नमस्कार केला.

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्ससुद्धा नमस्कार करताना दिसले. 11 मार्च रोजी लंडनमध्ये ते नमस्ते करून लोकांना अभिवादन करताना दिसले. माहितीनुसार कोरोना विषाणूच्या भीतीमुळे राजघराणेही खबरदारी घेत आहेत. यासोबतच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी काही पावले आवश्यक आहेत. नेतान्याहू म्हणाले की, प्रत्येकाने भारतीय मार्ग स्वीकारला पाहिजे आणि एकमेकांना नमस्कार करावा. विषाणूचा प्रादुर्भाव पाहता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी स्पेनच्या राजा आणि राणीला वेगळ्या प्रकारे अभिवादन केले. इमानुएलने नमस्ते करून दोघांचे स्वागत केले. याशिवाय इतर अनेक ठिकाणी इमॅन्युएल मॅक्रॉन देखील नमस्ते करताना दिसला.

अलीकडे अभिनेता सलमान खाननेही आपल्या चाहत्यांना कोरोना विषाणूमुळे इतरांना भेटताना नमस्ते कारण्याचा सल्ला दिला. जिमच्या आत, नमस्ते करत त्याने एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच अभिनेता अनुपम खेरनेही आपल्या चाहत्यांना ट्विटरवरून हँडशेकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की कोरोना व्हायरस रोगाचा संसर्ग टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नमस्कार. यांनतर अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत नमस्कार करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने जगभरातील सर्व ठिकाणी चित्रपटांचे शूटिंग एकतर रद्द केले गेले आहे किंवा ते पुढे ढकलले गेले आहे. अलीकडेच हॉलीवूडचा सुपरस्टार टॉम हॅन्क्सला संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे. जगभरात कोरोनाच्या दहशतीमुळे लोक हात मिळविणे किंवा मिठी मारणे टाळत आहेत. त्याऐवजी भारतीय पद्धतीने नमस्ते करत आहेत.