Coronavirus : ‘या’ कारणामुळं भारतात वाढणार नाही कोरोनाचा ‘डेथ’ रेट, डॉक्टरचा दावा, जाणून घ्या

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, डॉ. नरिंदर मेहरा यांनी दावा केला आहे की भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती बऱ्याच अंशी चांगली असल्याने इतर देशांप्रमाणे भारतात मृत्यूची संख्या वाढणार नाही.

आयसीएमआरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स इम्यूनोलॉजीचे माजी डीन डॉ. नरिंदर मेहरा म्हणाले की कोणत्याही विषाणूच्या संसर्गानंतर लिम्फोसाइटची संख्या सामान्यत: वाढत असते, परंतु कोविड -१९ च्या हल्ल्यात शरीरातील लिम्फोसाइटची संख्या कमी होते आणि नंतर व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. लिम्फोसाइट्स पांढऱ्या रक्त पेशी आहेत ज्या शरीराच्या मुख्य प्रकारच्या प्रतिरक्षा पेशींपैकी एक आहेत.

भारत प्रतिकारशक्तीच्या बाबतीत अव्वल

नरिंदर मेहरा म्हणाले की रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारत अव्वल आहे. एम्सच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की भारतातील विविधतेमुळे युरोपीय देशांपेक्षा प्रतिरक्षा प्रतिसाद जनुक अर्थात असे जीन्स जे रोग प्रतिकारशक्तीला मार्गदर्शन करतात ते अधिक मजबूत आहेत.

त्यांनी सांगितले की देशात कमी मृत्यूचे प्रमाण असल्याचे तीन कारणे आहेत. शारीरिक अंतर, रोगप्रतिकार प्रणाली आणि वातावरण. आपली हळद, आले आणि मसालेदार अन्न देखील आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. त्याच वेळी, डॉ नरिंदर मेहरा म्हणतात की ते आता फ्रान्स, अमेरिका, हंगेरियन देशातील कोरोनाचा नमुना घेऊन आंतरराष्ट्रीय अभ्यासाबाबत पाऊले उचलणार आहोत.

इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही, असा दावा डॉ. नरिंदर मेहरा यांनी केला आहे. याचे कारण ब्रॉड-बेस प्रतिकारशक्ती आहे. ते म्हणाले की इटली, स्पेन, अमेरिका सारखे मृत्यूचे प्रमाण भारतात वाढणार नाही. इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूचे ६०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना विषाणूमुळे देशात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संकट रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. जो की १४ एप्रिलपर्यंत असेल.

You might also like