COVID-19 : भारतात ‘कोरोना’च्या केसेस 6 लाखांच्या पुढे, केवळ 6 दिवसात आले 1 लाख नवे रूग्ण, 20 दिवसात 3 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रूग्णांचा आकडा 6 लाखांच्या पुढे गेला आहे. देशात एकुण रूग्णांची संख्या 6 लाख 5 हजार 220 आहे, ज्यामध्ये 17 हजार 848 लोकांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब ही आहे की, देशात कोरोना रूग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. मागील 20 दिवसातच 3 लाखपेक्षा जास्त केस समोर आल्या आहेत.

12 जूनला देशात एकुण रूग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली होती आणि सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अवघ्या 9 दिवसानंतर 20 जूनला रूग्णांचा आकडा 4 लाखांच्या पुढे गेला आहे आणि सुमारे 13 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 6 दिवसानंतर म्हणजे 26 जूनला रूग्णांचा आकडा 5 लाखांच्या पुढे गेला आणि सुमारे 16 हजार लोकांचा मृत्यू झाला.

देशात अवघ्या 6 दिवसात कोरोनाची 1 लाख आणखी प्रकरणे समोर आली आहेत आणि 2 जुलैपर्यंत रूग्णांचा आकडा 6 लाखांच्या पुढे गेला आहे. सुमारे 18 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे देशात एकुण कोरोना केसच्या अर्ध्या केस मागील 20 दिवसात समोर आल्या आहेत. मात्र, या दरम्यान कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांचा आकडाही वाढला आहे.

12 जूनपर्यंत 1 लाख 54 हजार रूग्णांनी कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली होती. 20 जूनला हा आकडा वाढून 2 लाख 27 हजार झाला. 26 जूनला देशात कोरोनातून बरे होणार्‍यांचाा आकडा 3 लाखांच्या जवळपास पोहचला. आता कोरोनातून ठिक होणार्‍या रूग्णांचा आकडा आंकडा 3 लाख 60 हजारच्या जवळपास पोहचला आहे.

कोरोना केसच्या प्रकरणात भारत आता चौथ्या नंबरवर आहे. भारतापेक्षा जास्त केस अमेरिका, ब्राझील आणि रशियात आहेत. मात्र, ज्या वेगाने भारतात केस वाढत आहेत, त्यावरून असे दिसते की पुढील दोन ते तीन दिवसात भारत, रशियाला मागे टाकू शकतो. सध्या संपूर्ण जगात 1 कोटी 8 लाखपेक्षा जास्त एकुण केस आहेत, ज्यापैकी 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.