भारतात धडकला ‘कोरोना’ व्हायरस, केरळमध्ये पहिला ‘रूग्ण’, चीनमधून परतला होता ‘व्यक्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंथा – चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा रुग्ण केरळमध्ये आढळला असून त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेथून हा संसर्गजन्य आजार फैलावला आहे. यात वुहानमध्ये २४हून अधिक मृत्यू पावले आहेत. एक हजार रुग्ण उपचार घेत आहेत. केरळमध्ये आढळलेला रुग्ण वुहान विद्यापीठातून नुकताच भारतात परतलेला आहे.कोरोनाच्या भितीमुळे चीनमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

भारतात विमानतळ, बंदरे अशा ठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्याची यंत्रणा सज्ज आहे. सर्दी वा ताप असणाऱ्या प्रवाशाला अधिक तपासणीसाठी आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले जात आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण वा पर्यटन याकरिता चीनमध्ये गेलेल्या नागरिकांबद्दल जगभरातील नातेवाईक काळजीत आहेत.