Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1806 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 98 हजार 618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 779 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 475 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 10 हजार 87 रुग्णांपैकी 82 हजार 432 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 145 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.88 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 765 रुग्णांपैकी 2 हजार 753 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 324 रुग्णांपैकी 7 हजार 268 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 494 आहे. कोरोनाबाधित एकूण 562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 776 रुग्णांपैकी 1 हजार 562 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 827 रुग्णांपैकी 4 हजार 603 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 253 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 806 , सातारा जिल्ह्यात 115, सोलापूर जिल्ह्यात 399, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 662 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 17 हजार 463 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 42 हजार 779 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like