Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2338 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयात कोरोनावरील औषधे उपलब्ध असलेल्या वितरकांची यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 2 लाख 96 हजार 367 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 84 हजार 635 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 239 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.05 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 54 हजार 506 रुग्णांपैकी 2 लाख 6 हजार 514 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 329 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.14 टक्के आहे.

 

coeona

 

 

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 824 रुग्णांपैकी 21 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 793 आहे. कोरोनाबाधित एकूण 906 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 309 रुग्णांपैकी 20 हजार 462 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 800 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 22 रुग्णांपैकी 19 हजार 664 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 223 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 974 रुग्णांपैकी 28 हजार 602 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 94 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 962 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 338, सातारा जिल्ह्यात 732, सोलापूर जिल्ह्यात 523, सांगली जिल्ह्यात 690 तर कोल्हापूर जिल्ह्यात 679 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 16 लाख 67 हजार 710 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 84 हजार 635 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 21 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )