Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2390 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 3 लाख 70 हजार 593 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 48 हजार 920 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 66 हजार 399 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 82.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 91 हजार 638 रुग्णांपैकी 2 लाख 47 हजार 931 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 37 हजार 68 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.01 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 718 रुग्णांपैकी 29 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 10आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 660 रुग्णांपैकी 27 हजार 436 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 31 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 518 रुग्णांपैकी 30 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 609 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 403 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 386 रुग्णांपैकी 35 हजार 226 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 681 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 479 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 558 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 390, सातारा जिल्ह्यात 371, सोलापूर जिल्ह्यात 296, सांगली जिल्ह्यात 393 तर कोल्हापूर जिल्ह्यात 108 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 6 हजार 27 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 952 ,सातारा जिल्हयामध्ये 839, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 185, सांगली जिल्हयामध्ये 689 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 362 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 19 लाख 78 हजार 284 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 48 हजार 920 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 3 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )