इयत्ता 1 ली ते 12 वी च्या अभ्यासक्रमात तब्बल 25 टक्क्यांनी कपात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार होतच आहे. याकाळात महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद आहेत. अशातच महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाहिली ते बारावीपर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

अभ्यासक्रम कपातीबद्दल अधिक माहिती एससीआरटीच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. कोरोनाच्या काळात 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असली तरी कोणत्याही शाळा सुरू झाल्या नाहीत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन आणि दुसऱ्या माध्यमातून क्लास भरत आहेत.

कोरोनाचा कहर वरचेवर वाढतच आहे. याकाळात विध्यार्थ्यांना कोणतंही मोठं दडपण नसावं म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.