Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2799 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 45 हजार 362 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 69 हजार 3 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 793 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 89 हजार 248 रुग्णांपैकी 2 लाख 44 हजार 979 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 37 हजार 693 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.70 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 347 रुग्णांपैकी 28 हजार 655 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 505 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 364 रुग्णांपैकी 26 हजार 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 933 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 125 रुग्णांपैकी 29 हजार 817 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 924 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 278 रुग्णांपैकी 34 हजार 864 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 948 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 681 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 571, सातारा जिल्ह्यात 535, सोलापूर जिल्ह्यात 410, सांगली जिल्ह्यात 786 तर कोल्हापूर जिल्ह्यात 379 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 5 हजार 104 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 799 ,सातारा जिल्हयामध्ये 595, सोलापूर जिल्हयामध्ये 444, सांगली जिल्हयामध्ये 931 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 335 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 19 लाख 58 हजार 772 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 45 हजार 362 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 2 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )