Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 372 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 4 लाख 72 हजार 512 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 5 हजार 878 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 213 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 153 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 24 हजार 666 रुग्णांपैकी 3 लाख 5 हजार 265 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 566 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 835 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.02 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 775 रुग्णांपैकी 42 हजार 134 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 894 रुग्णांपैकी 37 हजार 303 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 127 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 320 रुग्णांपैकी 42 हजार 152 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 520 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 223 रुग्णांपैकी 45 हजार 658 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 922 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 913 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 372, सातारा जिल्ह्यात 244, सोलापूर जिल्ह्यात 127, सांगली जिल्ह्यात 136 तर कोल्हापूर जिल्ह्यात 34 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 428 रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 715 ,सातारा जिल्ह्यामध्ये 236, सोलापूर जिल्हयामध्ये 161, सांगली जिल्ह्यामध्ये 222 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 94 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 16 हजार 172 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 5 हजार 878 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )