Coronavirus : राज्यात रविवारी 678 नवे रुग्ण तर 27 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 12974 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भा राज्यात वाढत असून आज (रविवारी) दिवसभरात 678 नवी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13 हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तर मृत्यूची संख्या 548 वर पोहचली आहे. आज दिवसभरात 115 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 2115 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत.

आज दिवसभरात मुंबईत करोनाने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 441 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 613 वर पोहचली आहे. तर आतापर्य़ंत 343 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 1 हजार 804 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती दिली आहे.

कोरोन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात तब्बल 2487 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या विळख्यात आल्याने तब्बल 87 जणांचा मृत्यू झाला आहे. रोज येणाऱ्या आकड्यांचा विचार करता हा आकडा फार मोठा आहे.