Coronavirus : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 705 नवीन ‘कोरोना’चे रुग्ण तर 45 जणांचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज (बुधवारी) तब्बल 705 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकिकडे मृत्यूदर कमी असल्याचा दावा करणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. त्यातही भिवंडीत एकाच दिवसात 21 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्य़ंत 17 हजार 823 रुग्ण आढळून आले आहेत. तर 595 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी ठाणे महानगर पालिका हद्दीत 190 कोरोनाबाधित तर 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 605 झाली आहे. तर मृतांची संख्या 175 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 128 रुग्ण तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 4189 तर मृतांची संख्या 129 वर पोहचली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये 135 रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2570 तर मृतांची संख्या 66 इतकी झाली आहे.

मिरा भाईंदरमध्ये 90 रुग्णांसह 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 1882 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 91 झाली आहे. भिवंडी महापालिका हद्दीत 37 रुग्णांची नोंद करण्यात आली असून आज दिवसभरात 21 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या 687 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 51 झाली आहे.
उल्हासनगरमध्ये 41 रुग्णांची नोंद झाली असून बाधितांची संख्या 857 झाली आहे तर मृतांची संख्या 28 झाली आहे. अंबरनाथमध्ये 40 रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 846 तर मृतांची संख्या 21 झाली आहे. बदलापूरमध्ये 17 रुग्णांची आज नोंद झाल आहे त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 448 झाली आहे. तर मृतांची संख्या 11 झाली आहे. ठाणे ग्रामीण भागता आज 27 रुग्ण आढळून आले असून तीघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीणमध्ये 739 कोरोनाचे रुग्ण असून मृतांची संख्या 23 झाली आहे.