Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 832 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 92 हजार 85 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 731 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 17 हजार 608 रुग्णांपैकी 2 लाख 94 हजार 70 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 16 हजार 46 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.59 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 410 रुग्णांपैकी 38 हजार 268 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 676 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 771 रुग्णांपैकी 33 हजार 687 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 700 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 653 रुग्णांपैकी 39 हजार 715 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 336 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 643 रुग्णांपैकी 44 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 973 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 604 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 832, सातारा जिल्ह्यात 274, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 226 तर कोल्हापूर जिल्ह्यात 74 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 703 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 530 ,सातारा जिल्हयामध्ये 575, सोलापूर जिल्हयामध्ये 263, सांगली जिल्हयामध्ये 264 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 71 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 68 हजार 636 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 92 हजार 85 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 22 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )