Coronavirus : इयत्ता 5 वी मधील विद्यार्थीनीची ‘कोरोना’वर संवेदनशील कविता

पोलीसनामा ऑनलाईन – सगळे बसतात घरात, प्राणी फिरतात रस्त्यात, प्राणी प्रक्ष्यांची झाली मजा, माणसांना मिळते आहे सजा, कोरोना जा कोरोना जा. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत समर्पक अशी ही कविता कोण्या मोठ्या कवीने नाही तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनीने केली आहे.

श्रावणी मयुरेश दीक्षीत या विद्यार्थिनीने ही कविता केली आहे. गेल्या दो महिन्यांपासून मुलं घरातच आहेत. कोरोनामुळे संपूर्ण उन्हाळी सुट्‌टी त्यांना घरातच घालवावी लागली. आता मुलांना शाळेचे वेध जरी लागले असले तरी शाळा कधीपासून सुरू होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. त्यामुळे मुलं घरात बसूनच ऑनलाईन अभ्यासाबरोबर आपले छंदही जोपासत आहेत.

श्रावणी दीक्षीतने ही आपला कविता करण्याचा छंद जोपासत कोरोनावरच कविता केली आहे. तीची कविता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला अत्यंत समर्पक आहे. आपल्या कवितेतून कोरोनाला जा म्हणणार्या श्रावणीने आम्ही मुलं किती कंटाळलो आहोत हे सांगितले आहे. तसेच डॉक्टर शोधतात तुझ्यावर लस, पोलीस करतात सगळा बंदोबस्त, तू आता इथं कसा राहशील? असे म्हणत जणू कोरोनाला खडसावलेच आहे. महत्वाचे म्हणजे तिने स्वच्छतेचे नियम आम्ही पाळू, सुरक्षित अंतर ठेवून चालू, वारंवार हात धुवू, एकत्र मिळून कोरोनाला हरवू असे सांगत कोरोनाला रोखण्याचे उपाय आणि त्याला हरविण्याचा संकल्प देखील व्यक्त केला आहे.