अमेरिकेत ‘कोरोना’ लाटेचा ‘हाहाकार’ ! 24 तासांत 2 लाखांपेक्षा अधिक जणांना बाधा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरस (CoronaVirus) महामारीच्या नव्या लाटेने अमेरिकेत ( america) थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत येथे तब्बल दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित समोर (more-two-lakhs-new-cases-last-24-hours) आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 कोटी 55 लाख 9 हजार 184 वर पोहोचला आहे.

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत अमेरिकेत 2 लाख 45 हजार 799 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 66 लाख एक हजार 331 जण लोक बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या अमेरिकेत एकूण 37 लाख 12 हजार 54 जणांवर उपचार सुरू आहेत, तर यातील 19 हजार 374 जणांची प्रकृती गंभीर आहे.
महामारीची सर्वांत वाईट वेळ’ येणे अद्याप बाकी

तज्ज्ञ

तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, आगामी थंडी आणि सुट्ट्यांसाठी अमेरिका अद्यापही तयार झाली नाही. कारण या वेळेपर्यंत कोरोना व्हायरस अमेरिकेत आतापर्यंतच्या सर्वांत घातक स्थितीत असू शकतो. द गार्डियनमधील लेखाप्रमाणे, आता अमेरिकेत लवकरच सुट्ट्यांचा काळ सुरू होत असून, या काळात येथे कौटुंबिक समारंभ होत असतात. यावेळी येथे कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे कठीण होणार आहे. उन युनिव्हर्सिटीचे एक डॉक्टर मेगन राणे म्हणाले, आता आम्ही महामारीच्या अत्यंत खराब काळात जात आहोत. यामुळे कोरोना महामारीसंदर्भात देशाचे भविष्य पुढील दोन महिन्यांवरच अवलंबून आहे.
आपण थकू शकतो व्हायरस नाही

WHO

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख ट्रेडोस घेब्रेसस यांनी कोरोना वायरससंदर्भात लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, आपण थकू शकतो मात्र कोरोना आपल्याकडून थकायला तयार नाही. यावेळी ट्रेडाेस यांनी, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जाे बायडन यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आशा आहे की या महामारीचा सामना करण्यास, जागतिक सहकार्य मिळेल. ट्रेडोस स्वतः एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. यामुळे त्यांनी स्वतःला क्वारंटाईनदेखील केले होते. महत्वाचे म्हणजे, अशक्त व्यक्तींवर कोरोना लवकर हल्ला करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.