‘कोरोना’ व्हायरसपासून ‘बचावा’साठी ‘डायट’मध्ये ‘या’ गोष्टींचं ‘सेवन’ करा, विषाणुचा ‘हल्ला’ होईल ‘निकामी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात 565 मृत्यू झाले आहेत. तर 28 हजारपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या तीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. संसर्ग झालेल्या या सर्व व्यक्ती चीनहून परतल्या होत्या. ज्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमजोर झाली आहे, अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण लवकर होते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वच्छेतेचे मुलभूत नियम पाळण्याबरोबरच आपल्या आहारात काही अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती मजबूत होते. जीवनशैलीचे तज्ज्ञ ल्यूक कॉटिन्हो यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या विषाणुंपासून वाचण्यासाठी काय करावे, याबाबत सांगितले आहे.

ल्यूक यांचे म्हणणे आहे की, या विषाणुंपासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमची रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करावी लागेल. जर एकवेळ हा विषाणू माणसाच्या शरीरात शिरला तर यापासून वाचणे अवघड आहे. कारण या व्हायरसवर अजून कोणतेही औषध नाही. कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, डोकेदुखी आणि घशात खवयव यांचा समावेश होतो. याशिवाय श्वास घेण्यास त्रास हे सुद्धा प्रमुख लक्षण आहे. या व्हायरसचा संक्रमण काळ 14 दिवसांचा असतो. अशावेळी तुमची रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असल्यास तुम्ही या व्हायरसशी लढू शकता.

लसूण
लसूण सर्वाधिक शक्तीशाली अँटी वायरल फूड आहे. लसूण सेवन केल्यास रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

आले
आले खाल्ल्याने सुद्धा रोग प्रतिकारकशक्ती वाढते. तुम्ही मधासोबत आले खाऊ शकता. यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

खोबरेल तेल
लसूण आणि आल्याप्रमाणे खोबरेल तेल सुध्दा रोग प्रतिकारकशक्ती वाढवते. तुम्ही शुद्ध खोबरेल तेलात जेवण तयार करा. या तेलात लॉरिक अ‍ॅसिड आणि कॅप्रिलिक अ‍ॅसिड असते जे अँटी-वायरल असते. यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तुम्ही शेंगदाणे, पिस्ता, डार्क चॉकलेट, द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी खाऊ शकता. हे सर्व अँटी-वायरल फूड आहे आणि याच्या सेवनाने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. याशिवाय आपल्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचाही समावेश करा.