Coronavirus : ‘कोरोना’च्या प्रकरणांमध्ये पुन्हा ‘विक्रमी’ वाढ, 24 तासात 15968 नवे रूग्ण, आता एकुण 4.56 लाख केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संक्रमितांची संख्या आता 4 लाख 56 हजार 183 झाली आहे. 24 तासात देशभरात कोरोनाची विक्रमी 15968 नवी प्रकरणे समोर आली आहेत. एक दिवसात 465 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, कोरोनाच्या सध्या 1 लाख 83 हजार 22 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. या व्हायरसच्या संसर्गाने आतापर्यंत 14 हजार 476 लोकांचा बळी गेला आहे. तर 2 लाख 58 हजार 684 लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे भारतात प्रति एक लाख लोकसंख्येत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर याची जागतिक सरासरी 6.04 आहे. देशात लागोपाठ पाचव्या दिवशी संसर्गाची 15 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार, दिल्लीत एक दिवसात सर्वात जास्त 3947 लोकांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. राजधानीत आतापर्यंत 66 हजारपेक्षा जास्त बाधित सापडले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात मंगळवारी 3,214 नवे रूग्ण सापडले. यामुळे राज्यात एकुण संक्रमितांची संख्या 1 लाख 39 हजार 10 झाली आहे.

तर, यूपीमध्ये मंगळवारी 571 नवे रूग्ण वाढले आणि 19 मृत्यू झाले. गौतमबुद्धनगर (नोएडा) मध्ये 59, गाजियाबादमध्ये 34 आणि लखनऊमध्ये 26 पॉझिटीव्ह केस सापडल्या. राज्यात संक्रमितांची संख्या 18 हजार 893 वर पोहचली आहे. गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात सुद्धा कोरोना प्रकरणांची संख्या जास्त झाली आहे.

भारत जगातील चौथा सर्वात प्रभावित देश
कोरोना संक्रमितांच्या संख्येवरून भारत जगातील चौथा सर्वात प्रभावित देश आहे. भारतापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका (2,424,144), ब्राझील (1,151,479), रशिया (599,705) मध्ये आहेत. तर, भारत रोज येणार्‍या केसच्या बाबतीत तिसर्‍या नंबरवर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर एका दिवसात सर्वात जास्त प्रकरणे भारतात नोंदली गेली आहेत.

देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट 6% वाढून 56.38% झाला
दरम्यान, भारताचा रिकव्हरी रेट 56.38% झाला आहे. मंगळवारी 10 हजारपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 2 लाख 58 हजार 684 लोक रिकव्हरी झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, भारतात लोकसंख्येची घनता जास्त असूनही प्रति लाख कोरोना रूग्णांची संख्या सर्वात कमी आहे. जगात प्रति लाख 116.67 प्रकरणे आहेत, परंतु भारतात त्यांची संख्या 32.04 प्रति लाख आहे. सर्वात जास्त वाईट स्थिती अमेरिकामध्ये आहे. येथे प्रति एक लाख लोकसंख्येवर 722 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.

जगभरात कोरोनाने आतापर्यंत 92 लाखपेक्षा जास्त बाधित
जगात कोरोना व्हायरसने आतापर्यंत 92 लाख 55 हजार 730 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 49 लाख 86 हजार 516 लोक बरे झाले आहेत. तर, 4 लाख 75 हजार 909 लोकांचा मृत्यू झाला आहे.