‘कोरोना’त बिहारमध्ये भाजपा आमदाराला VIP पास देणारा अधिकारी ‘निलंबित’

पोलीसनामा ऑनलाइन – मुलीला कोट्टावरुन आणण्यासाठी बिहारमधील भाजपा आमदाराला विशेष पास देणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानमधील कोट्टा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच संतापले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर अशा गोष्टींना परवानगी देण्यात येऊ नये मत त्यांनी नोंदवले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांच्याच राज्यातील एका भाजपा आमदाराला थेट 2 हजार 200 किमी प्रवास करण्याची परवानगी देणारा पास देण्यात आल्याची घटना उघड झाली. त्यानंतर नितिश कुमार यांच्यावर चांगलीच टीका झाल्याचे दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदाराला पास देणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले असून आता राज्यामध्ये अशा प्रकारचे पास देण्याचे हक्क केवळ जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

नावाडा येथील सादारचे उपविभागीय अधिकारी असणार्‍या अनू कुमार यांना निलंबित करण्यात येत असल्याचे पत्रक मंगळवारी संध्याकाळी जारी करण्यात आले आहे.अनू यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनीच हिसुआ (नावाडा) येथील आमदार असणाऱे अनिल सिंघ यांना हिसुआ ते कोट्टा प्रवास करण्याचा 10 दिवसांची मुदत असणारा पास दिला होता. वेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करण्याची मूभा देणारा पास कुमार यांनी दिला. याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात येत आहे. लॉकडाउनदरम्यान अशा प्रकारचा पास अगदीच आपत्कालीन परिस्थितीमध्ये देण्यात येतो, पत्रकामध्ये म्हटले आहे.हिसुआचे (नावाडा) आमदार असणाऱे अनिल सिंघ यांना नावाडा जिल्हा प्रशासनाने विशेष पास उपलब्ध करुन दिला. त्यामुळेच सिंघ यांनी नावाडा ते कोट्टा असा 2 हजार 200 किमीहून अधिक प्रवास करत मुलीला ते परत घेऊन आले. कोट्टा हे शहर मेडिकल तसेच इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या क्लासेससाठी लोकप्रिय आहे