कोविडच्या विरूद्ध गृह मंत्रालयाची नवी गाईडलाइन्स, 1 ते 31 डिसेंबरपर्यंत प्रभावी, जाणून घ्या काय आहेत दिशानिर्देश

नवी दिल्ली : देशभरात कोविड केस वाढत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. गृह मंत्रालयाने देखरेख, नियंत्रण आणि सावधगिरीचे दिशा-निर्देश जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या नवे दिशानिर्देश 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत प्रभावी राहतील. मुख्य फोकस कोविड-19 च्या संसर्गावर मिळवलेले नियंत्रण मजबूत करणे आहे. काही राज्य, केंद्र शासित प्रदेशांमध्ये पुन्हा कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत चालल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड-19 च्या स्थितीच्या देखरेखीसाठी दिशा-निर्देश जारी केले. राज्यांनी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन कठोरपणे करणे, तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीमध्ये दररोज 7000-8000 प्रकरणे समोर येत आहेत. सणांसाठी उसळलेल्या गर्दीमुळे आणखी प्रकरणे वाढली आहेत.

केंद्र सरकारने राज्यांना निर्देश दिले आहेत की, याचे कठोरपणे पालन करावे. शक्य असेल तर नाईट कर्फ्यू लागू करू शकता. पंजाबने 1 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. रात्री 9.30 नंतर सर्व हॉटल, पब बंद केले जातील. राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अधिकार्‍यांना सांगितले आहे की, याचे पालन कठोरपणे करा.

केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी रात्रीच्या कर्फ्यूसारखे प्रतिबंध लागू करू शकता, परंतु निषिद्ध क्षेत्रांच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन लावण्यापूर्वी केंद्राशी विचार-विनिमय करावा लागेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने डिसेंबरसाठी देखरेख, प्रतिबंध आणि सावधगिरी दिशा-निर्देश जारी करत म्हटले आहे की, निर्देशांचे मुख्य लक्ष्य देशात कोविड-19 च्या विरोधात जे यश मिळाले आहे, ते कायम राखणे हे आहे.

You might also like