Coronavirus : चीनमध्ये 4 फूट अंतरावरून केस कापतात आता ‘सलून’मध्ये, नाव – ‘लॉन्ग डिस्टेंस हेअरकटिंग’

नवी दिल्ली, वृतसंस्था : कोरोनाव्हायरसमुळे चीनमध्ये आतपर्यंत 80,409 लोकांना संसर्ग झाला असून जवळपास 3012 लोकांचा ,मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसची भीती इतकी जास्त आहे की, न्हावी लोक तीन ते चार फूट अंतरावरून केस कापत आहेत. असे अनेक व्हिडिओ चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चीनमधील हेनान प्रांतातील सलूनमध्ये न्हावी लोक तीन ते चार फूट अंतरावर ग्राहकांचे केस कापत आहेत. लोकांच्या केसांची स्टाईलिंगही तीन ते चार फूट अंतरावरुन सुरू आहे.

हेनान प्रांतातील अनेक हेयर ड्रेसर्स एक अनोखी पद्धत काढली आहे. हे लोक लांब- लांब काठ्यांवर आपल्या कात्र्या, ट्रिमर, ब्रशेस इत्यादी ठेवून हेअर स्टाईलिंग करत आहेत. केवळ हेनान प्रांतातच नव्हे तर चीनच्या सिचुआन प्रांतातील लुझोउ येथेही न्हावी ही पद्धत वापरत आहेत. चीनचे लोक त्याला ‘लॉन्ग डिस्टंन्स हेअर कटिंग’ म्हणून संबोधत आहेत.

लुझोउचे हेअर स्टाइलिश हे बिंग म्हणाले की, क्वारंटिन जवळजवळ संपले आहे. लोक आता बाहेर येत आहेत. परंतु बचावासाठी जरुरी आहे कि आम्ही लांबूनच हेअर कटिंग करू. या कामात कष्ट खूप जास्त आहे. लहान लहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपल्या हातात बरीच ताकद असावी लागते. तरच आपण अशा अंतरावरुन मशीन धरून ठेवू शकता आणि कटिंग करू शकाल.

दरम्यान, चीनी सरकारने एक आदेश जारी केला आहे की, आपण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून सुमारे 5 फूट अंतर ठेवा. जेणेकरुन कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होवो. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे नवीन संक्रमित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याच वेळी, जगातील इतर देशांमध्ये कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे.