शंभर पेक्षा जास्त जिल्ह्यात 7 दिवासात 100 टक्क्यांनी वाढले ‘कोरोना’चे रूग्ण, स्वगृही परतलेले प्रवासी मजूर कारणीभूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या सुमारे 16 टक्के जिल्ह्यांमध्ये सात दिवसांच्या आत कोरोना व्हायरसच्या केस 100 टक्के वाढल्या आहेत. यापैकी सुमारे अर्धे जिल्हे ग्रीन झोन आहेत. 717 जिल्ह्यांच्या 20 मेपर्यंतच्या आकड्यांचे विश्लेषण केले असता यामध्ये ही बाब समोर आली आहे. तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, ही वाढ मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांतून आपल्या घरी परतणार्‍या प्रवासी मजूरांमुळे होत आहे.

राजस्थानमध्ये डुंगरपुर जिल्ह्याच्या आकड्यावरून समजते की, सात दिवसात येथे कोविड-19 च्या केसमध्ये 1,500 टक्केपेक्षा अधिक वाढ नोंदली गेली आहे. अशाप्रकारे, बिहारच्या जमुई जिल्ह्यामध्ये 1,300 टक्क्क्यांची वाढ दिसून आली. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बलिया आणि आंबेडकर नगर जिल्ह्यांमध्ये सात दिवसात 1,100 टक्के वाढ नोंदली गेली आहे. अशाप्रकारे पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात 900 टक्के आणि ओडिशाच्या कटक जिल्ह्यात 750 टक्के वाढ नोंदली गेली आहे.

परंतु, प्रत्यक्षातील संख्येप्रमाणे पाहिले असता ही संख्या जास्त नाही, परंतु या वाढीमुळे कोरोनाच्या संसर्ग वाढीच्या दरामुळे स्थानिक अधिकार्‍यांसमोर एक नवे आव्हान निर्माण केले आहे. उदाहरणार्थ, सात दिवसात बिहारच्या जुमईमध्ये 14 आणि सुपौलमध्ये 26 केस समोर आल्या आहेत. परंतु, ही संख्या टक्केवारीमध्ये पाहिल्यास हा वृद्धी दर 100 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

एकुण 112 हाय रिस्क जिल्ह्यांमधील एक चतुर्थांश उत्तर प्रदेश (27) मध्ये आहेत, यामध्ये मध्य प्रदेश (11), ओडिसा (10) आणि बिहार (9) मध्ये आहेत. ग्रीन झोनमध्ये येणार्‍या ज्या 54 जिल्ह्यांमध्ये सर्वात वेगाने वाढ नोंद झाली आहे, त्यामधील 14 उत्तर प्रदेशचे, सात ओडिसा आणि सहा आसाममधील जिल्हे आहेत.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ग्रीन झोन वर्गीकरणाची व्याख्या करताना म्हटले होते की, हे असे जिल्हे असतील जेथे मागील 21 दिवसात कोणतीही केस समोर आलेली नाही.

यलो कॅटेगरीत सुमारे 53 जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या केसमध्ये 100 टक्के पेक्षा जास्त वृद्धी झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे 12 जिल्हे, बिहारचे 7 आणि मध्य प्रदेशचे 5 जिल्हे आहेत.

पाच जिल्हे, ज्यांना सरकारने रेड झोनमधये ठेवले आहे, तेथे सुद्धा कोरोनाच्या केसमध्ये 100 टक्केपेक्षा जास्त वाढ नोंदली गेली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचा खंडवा आणि ग्वालियर, ओडिसाचा भद्रक, पश्चिम बंगालचा मालदा आणि उत्तर प्रदेशचा रामपुर जिल्हा आहे.

डीआययूला हेदेखील आढळले की, भारतात एकुण 303 जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये 99 टक्केपर्यंत वाढ दिसून आली आहे.

आकड्यावरून समजते की, 20 मे रोजी मागील सात दिवसात, सुमारे 136 जिल्ह्यात कोरोना व्हायरसची कोणतीही केस समोर आलेली नाही. ही आशादायक किरणे तेलंगाना, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडुमूधन आली आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या केसेस समोर येण्याच्या कारणांमध्ये एक कारण प्रवासी मजूर आहे.

इन्टरनॅशनल इन्स्टीट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबईकडून नुकत्याच एका अभ्यासातून समजले की, बिहार, ओडिसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये 9 मेनंतर कोरोना व्हायरसच्या केसमध्ये वाढ नोंदली गेली आहे. मोठ्या संख्येने प्रवासी मजूर शहरांतून आपल्या घरी परतत असल्याने असे होत आहे.

राज्य सरकार शहरांतून परतणार्‍या जास्तीतजास्त प्रवासी मजूरांची टेस्ट करत आहेत. बिहारमध्ये 18 मेपर्यंत बाहेरून आलेल्या 8,337 लोकांच्या टेस्ट केल्या गेल्या आणि यामध्ये 651 लोक पॉझिटीव्ह आढळले आहेत. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, 20 मेपर्यंत दुसर्‍या राज्यांतून परतणार्‍या एकुण 1,041 प्रवासी मजूरांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी म्हटले की, राज्यात परतणार्‍या प्रवासी मजूरांमध्ये मोठ्या संख्येने संसर्गाच्या केसेस समोर येत आहेत. यासाठी गाव आणि मोहल्ल्यांच्या देखरेख समित्यांनी संसर्ग नियंत्रण करणे खुप गरजेचे आहे. जे लोक बाहेरून आलेले आहेत, त्यांना होम क्वारंटाईन केले पाहिजे.