शास्त्रज्ञांचा दावा – ‘चीनने लॅबमध्ये बनवला कोरोना व्हायरस, जगाला फसवण्यासाठी केलं होतं ‘रेट्रो’ इंजीनियरिंग’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे (coronavirus)  चीन मोठ्या कालावधीपासून जगाच्या निशाण्यावर आहे. हा व्हायरस (coronavirus) कसा निर्माण झाला आणि कशाप्रकारे त्याने जगभरात कहर केला, यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आता एका स्टडीमध्ये समोर आले आहे की, चीनच्या शास्त्रज्ञांनी वुहान इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये कोविड-19 चा व्हायरस (coronavirus)  तयार केला होता. रेट्रो इंजिनियरिंगद्वारे चीनी शास्त्रज्ञांनी जगाला असे दाखवण्याचा प्रयत्न केला की, व्हायरस मानव निर्मित नसून वटवाघुळमधून आला आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटनचे प्रोफेसर अँगस डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळापासून चीनच्या व्हायरसचे रेट्रो इंजिनियरिंगचे पुरावे आहेत. प्रोफेसर डल्गलिश लंडन सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीत कॅन्सर विज्ञानाचे प्रोफेसर आहेत. तर डॉ. सोरेनसेन एक वायरोलॉजिस्ट आणि इम्यूनोर कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी कोरोनाची व्हॅक्सीन तयार करत आहे.

खास फिंगर प्रिंटचा लावला होता शोध
स्टडीनुसार, वुहान लॅबमध्ये जाणीवपूर्वक डाटा अगोदर लपवला गेला आणि नंतर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या शास्त्रज्ञांनी यावरून आवाज उठवला होता त्यांना एकतर गप्प केले किंवा नंतर गायब केले. त्यांनी सांगितले की, कोरोना सॅम्पल्सच्या अभ्यासादरम्यान त्यांनी एक फिंगरप्रिंट शोधला होता. हे लॅबमध्ये व्हायरससोबत छेडछाडनंतरच शक्य आहे.

डल्गलिश आणि सोरेनसेन यांचे म्हणणे आहे की, त्यांना संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करायचे होते तेव्हा अनेक सायन्टिफिक जर्नलने नकार दिला. कोरोना व्हायरसच्या सुरुवातीला मानले गेले होते की, हा व्हायरस वटवाघुळमधून मनुष्यात पसरला आहे. मात्र, नंतर अनेक लोकांचे हे म्हणणे आहे की, व्हायरस चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत बनवला गेला होता.

 

Also Read This : 

 

 

8 तास झोप घेतल्यानंतर सुद्धा जाणवत असेल थकवा, तर असू शकते ‘ही’ 5 कारणं, ‘हे’ 6 उपाय करून पहा

 

लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर

 

Black Fungus Symptoms : डोकेदुखी सुद्धा असू शकते का ब्लॅक फंगसचे लक्षण ?, जाणून घ्या

 

एका रात्रीतून दूर होईल underarms काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

 

Chhatrapati Sambhaji Raje : ‘डॉ. आंबेडकर-शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत ?’

 

डोळयांवर जमा झालेल्या कोलेस्टेरॉल हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या