Coronavirus : सोनिया अन् राहुल गांधींवर भडकली ‘ही’ महिला सरपंच (व्हिडीओ)

जयपूर : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राजस्थानमधील भिलवाडा गावाने कोरोनाविरुद्ध लाढा देऊन एक पॅटर्न देशासमोर ठेवला आहे. भारतात 7 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत तर 230 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट असलेल्या भिलवाडा गावचा पॅटर्न नावारुपला आला आहे.

भीलवाडा गावातील परिस्थिती सुधारली असून मागील 8 दिवसात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. सुरुवातीला या गावामध्ये 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 13 जण बरे घेऊन घरी परतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या गावचा पॅटर्न देशात राबवण्यासाठी माहिती मागवली आहे. भीलवाडा गावाला कोरोना पूर्णपणे रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाने या गावात सक्तीने स्किनिंग केल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आला.

भिलवाडा गाव कोरोनापासून मुक्त झाल्याने याचे श्रेय घेण्यासाठी अनेकांमध्ये रस्सीखेच होताना पहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहूल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिल्यामुळे भिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच किस्मत गुर्जर या नाराज झाल्या आहेत. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सोनिया गांधी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

किस्मत गुर्जर म्हणाल्या की, आज जो भिलवाडा पॅटर्न प्रसिद्ध झाला आहे त्यामागे शेतकरी, महिला, गावकरी आणि भिलवाड्यातील स्वयंसेवी संस्था यांची मेहनत आहे. मागील काही दिवसांपासून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या लोकांनी कोरनाशी लढण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, त्या ठिकाणी लोकांनी फक्त लॉकडाऊनचं पालन केले नाही, तर सोशल डिस्टेसिंग आणि स्वच्छतेची काळजी घेतली. ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नाही तर सतर्कता आणि संयम ठेवण्याची आहे असे त्या म्हणाल्या.

भिलवाडा मॉडेल म्हणजे काय ?
राजस्थानमधील भिलवाडा येथे कोरोनाचा सामना करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आलेले धोरण आता देशात राबवले जाऊ शकते. या ठिकाणी डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढली. मात्र, नंतर ही संख्या 27 पेक्षा जास्त रुग्णांपर्यंत पोहोचली नाही. कोरोनाचा रुग्ण सापडताच या ठिकाणी कर्फ्यू लागू करून शहराच्या सीमा सील करण्यात आल्या. शहरातील सर्व हॉटेल आणि खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली. लॉकडाऊचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. घरोघरी स्क्रिनिंग करण्यात आले. लोकप्रतिनिधी, माध्यम आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही शहरात प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे काही अधिकाऱ्यांनाच फक्त शहरात प्रवेश देण्यात आला.