Coronavirus : पद्मश्री आणि सुवर्ण मंदिराचे माजी ‘हजुरी रागी’ निर्मल सिंह यांचे ‘कोरोना’मुळे निधन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी पहाटे साडेचार वाजता पद्मश्री आणि सुवर्ण मंदिराचे माजी ‘हजुरी रागी’ निर्मल सिंह यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले आहे. यांच्या मृत्यूबरोबर देशात संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता वाढली आहे. निर्मल सिंह यांना कोरोनाची बुधवारी पुष्टी झाली होती. पंजाबच्या अमृतसरमध्ये सिव्हिल सर्जन प्रदीपदीप कौर जोहलने सांगितले की, 62 वर्षाचे निर्मल सिंह यांच्या तपासणी अहवालात कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाली होती.

डॉक्टरांनी सांगितले की, निर्मल सिंह नुकतेच परदेश प्रवास करुन परत आले होते. 30 मार्च रोजी त्यांनी श्वास घेण्यास त्रास आणि चक्कर येण्याची तक्रार केली  होती. त्यानंतर त्यांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल केले गेले. जेथे त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली.

अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये झाले होते सहभागी
अधिकाऱ्यांनी सांगितले की, परदेशातून आल्यानंतर निर्मल सिंह दिल्लीसह अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. यासह निर्मल सिंह यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह व इतर नातेवाईकांसह 19 मार्च रोजी चंदीगड येथील त्यांच्या घरी कीर्तनाचे आयोजन केले होते. त्यांच्या दोन मुली, मुलगा, पत्नी, ड्रायव्हर आणि त्याच्यासह इतर सहा जणांना रुग्णालयात वेगळे ठेवले गेले आहे. तसेच, त्यांची कोरोना विषाणूची चाचणी केली जाईल.

You might also like