Coronavirus : ‘होम कॉरटाईन’ डावलून अंबाबाई मंदीरात प्रवेश, एकावर FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाचा कहर सुरू असताना आणि होम कोरंटाईनमध्ये अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपमध्ये पुजेच्या साहित्यासह आलेल्या एकावर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश कृष्णराव कोरकर ( वय६५,रा. मंगळवार पेठ) यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनामुळे मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. शिवाय कडक संचारबंदी सुरू असतानाच थेट श्री.अंबाबाई मंदिरातच होम कोरोंटाईन करण्यात आलेली व्यक्ती बिनधास्तपणे पुजेसाठी आली होती. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचाही प्रश्न समोर आला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दि. १६ ते ३१ मार्च या कालावधीत घरीच राहणेबाबतचा (होम कॉरटाईन) आदेश दिला आहे. प्रकाश कोरकर यांना दि. १४ ते २८ मार्च पर्यंत होम कॉरटाईन केले आहे. तरीसुद्धा ते आज सकाळी दहाच्या सुमारास श्री.अंबाबाई मंदीरातील गरुड मंडप येथे पुजेच्या साहित्यासह सार्वजनिक ठिकाणी आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने कोरकर यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे