Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75083 नवे पॉझिटिव्ह, अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 10 लाखापेक्षा कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरस अजूनही नियंत्रणात आलेला नाही. मात्र, मागील काही दिवसांमध्ये रोज येणार्‍या संख्येत थोडी घट नोंदली गेली आहे. तर लागोपाठ 1,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 75,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आणि 1,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर संसर्गाची एकुण प्रकरणे 55 लाखांच्या पुढे गेली आणि मृतांची एकुण संख्या 89,000 च्या जवळ पोहचली आहे. आतापर्यंत 45 लाख लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी आकड्यांनुसार, मागील 24 तासात 75,083 नवी प्रकरणे नोंदली गेली तर 1,053 लोकांचा मृत्यू झाला. तर या दरम्यान, 1,01,468 लोक बरे झाले. सध्या देशभरात एकुण अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या – 9,75,861, आणि बरे झालेल्या रूग्णांची संख्या 44,97, 867 आणि मृतांची संख्या 88,935 आहे. सध्या देशात 80.12% लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 1.60% लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 18.28% लोकांवर उपचार सुरू आहे.

21 सप्टेंबरपर्यंत 6,53,25,779 नूमन्यांची चाचणी करण्यात आली. ज्यापैकी 9,33,185 नमून्यांची सोमवारी टेस्टींग करण्यात आली.

महाराष्ट्रात 15,738 नवी प्रकरणे, 344 मृत्यू
महाराष्ट्रात सोमवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 15,738 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या वाढून 12,24,380 वर पोहचली. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याने ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, याच कालावधीत कोविड-19 च्या 344 रूग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत जीव गमावणार्‍या रूग्णांची एकुण संख्या 33,015 झाली आहे. 344 नव्या मृत्यूंपैकी 200 मृत्यू मागील 48 तासात झाले होते, तर 81 मृत्यू मागील आठवड्यात झाले होते आणि 63 मृत्यू त्यापूर्वीचे आहेत. तर, सोमवारी 32,007 लोक बरे झाले. राज्यात आतापर्यंत 9,16,348 रूग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 2,74,623 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.