COVID-19 in India : कोरोनामुळे 24 तासात 3286 जणांचा मृत्यू, भारतात एकुण मृतांचा आकडा दोन लाखांच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत मृतांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी देशात पहिल्यांदा मृतांची संख्या 3 हजारच्या पुढे गेली. मंगळवारी सुद्धा लागोपाठ सातव्या दिवशी भारतात 3 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे आली आणि लागोपाठ आठव्या दिवशी 2,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले.

नवी प्रकरणे, मृत्यूंमध्ये वेगाने वाढ
माहितीनुसार, मागील 24 तासात 3,286 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर मृतांची एकुण संख्या 2,01,180 झाली. देशात कोरोनाच्या केस आणि मृतांची संख्या, वेगाने वाढत आहेत. महामारीच्या सुरुवातीनंतर पहिल्यांदा भारतात एका दिवसात 3,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले. मागील 24 तासात 3,62,770 नवे रूग्ण आढळले.

महाराष्ट्रात पुन्हा सर्वात जास्त प्रकरणे
नव्या प्रकरणात केरळ – 32,819, पश्चिम बंगाल -16,403, तमिळनाडु -15,830, गुजरात -14,352, हरियाणा- 11,931, तेलंगाना -10,122, उत्तराखंड- 5,703, जम्मू-काश्मीर 3,164 आणि हिमाचल प्रदेशच्या 2,157 प्रकरणांचा समावेश आहे. पुद्दुचेरीत 1,021 आणि चंदीगढमध्ये 837 प्रकरणे नोंदली गेली. मागील 24 तासात एकुण 15 राज्यांत 10,000 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

66,358 प्रकरणांसह महाराष्ट्र नंबर 1 वर आहे आणि यानंतर युपी, केरळ आणि कर्नाटक आहे. या तीन राज्यांतून 30,000 पेक्षा जास्त प्रकरणे आली आहेत. राष्ट्रीय राजधानीत 24,149 प्रकरणे नोंदली गेली. तर पश्चिम बंगाल आणि राजस्थानात मंगळवारी 16,000 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. तमिळनाडु, छत्तीसगढ, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, आंध्र आणि तेलंगानात 10,000-15,000 च्या दरम्यान केस नोंदल्या गेल्या. ओडिसा, झारखंड, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये 6,000 प्रकरणे आली तर जम्मू-काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा आणि पुद्दुचेरीत 1,000 आणि 3,000 च्या दरम्यान नवीन प्रकरणे आढळली.

मंगळवारी 13 छोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1000 पेक्षा कमी प्रकरणे समोर आली. नऊ राज्यांत मंगळवारी शंभरपेक्षा जास्त मृत्यू झाले. महाराष्ट्रात 895 लोकांचा मृत्यू झाला आणि यानंतर दिल्लीत मागील 24 तासात 381 लोकांचा मृत्यू झाले.

युपी आणि छत्तीसगढमध्ये 200 पेक्षा जास्त मृत्यू झाले तर कर्नाटक, गुजरात, झारखंड, राजस्थान आणि पंजाबमध्ये मंगळवारी शंभरपेक्षा जास्त मृत्यू झाले. एमपी, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणाने मागील 24 तासात 80 ते 100 लोकांचा मृत्यू झाला तर तमिळनाडु, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगानात 50-80 लोकांचा मृत्यू झाला.