Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 9,815 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरताना पहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 3 हजार 502 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 9 हजार 815 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 49 हजार 669 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.54 टक्के झाले आहे. राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 404 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 64 लाख 37 हजार 416 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 42 हजार 949 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 45 हजार 905 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 02 लाख 94 हजार 500 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2380 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

आज ओमायक्रॉनचे 2018 रुग्ण
राज्यात आज 218 नवीन ओमायक्रॉन (Omycron) रुग्णांची भर पडली आहे.
त्यापैकी 201 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (Indian Institute of Science Education and Research) व 17 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (National Chemical Laboratory) यांनी रिपोर्ट केले आहेत.
आज वाढलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) 172 आहेत. पुणे मनपा (PMC) 30,
गडचिरोली (Gadchiroli) 12 आणि पुणे ग्रामीणमध्ये (Pune Rural) 4 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत 3986 रुग्णांपैकी 3334 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

 

Web Title :-  Coronavirus in Maharashtra | 9,815 patients corona free in the last 24 hours in the state, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO Interest Rate | पुढील महिन्यात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 24 कोटी लोकांना मिळेल खुशखबर?

 

Plant Based Meat | वेगन मीट म्हणजे काय? हे प्रत्यक्षातील मांसापेक्षा हेल्दी असते का?

 

Gangubai Kathiawadi | ‘ही’ने अलियाला देखील मागे टाकलं; ‘गंगूबाई काठियावाडी’ला देतेय टक्कर (व्हिडीओ)

 

Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी