Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,399 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) घट होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढत आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 1 हजार 172 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 50 लाख 585 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.57 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 216 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 16 हजार 658 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 26 लाख 211 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 11 हजार 078 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 65 हजार 826 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 867 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Comfortable! 1,399 patients corona free in last 24 hours in the state, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Slab Collapses | पुण्याच्या बालेवाडीतील ‘अ‍ॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन’ साईटवर स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी, साईराज बिल्डकॉनच्या तिघांवर FIR

NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग

Post Office Scheme | फायद्याची गोष्ट ! 1500 रुपये दरमहा जमा केल्यास मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही