Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,879 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 1 हजार 825 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 879 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 27 लाख 426 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.43 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 21 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 886 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 25 हजार 728 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 13 लाख 70 हजार 390 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 96 हजार 645 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 05 हजार 205 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,004 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! 2,879 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | …म्हणून पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेल्यांना जातपडताळणी कार्यालयात प्रस्तावांच्या प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन

Diabetes | ‘या’ 7 नैसर्गिक गोष्टी डायबिटीजमध्ये ‘रामबाण’, तात्काळ ‘कंट्रोल’ होते ब्लड शुगर; जाणून घ्या

Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त