Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात ‘कोरोना’च्या दैनंदिन मृत्यूसंख्येत मोठी घट, आज 1437 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यातच आज मृत्यूसंख्येत मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 437 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 3 हजार 375 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 94 हजार 439 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.91 टक्के झाले आहे. राज्यात आज 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजपर्यत राज्यात 1 लाख 43 हजार 582 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 72 लाख 32 हजार 001 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 58 हजार 431 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 16 हजार 422 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 02 लाख 04 हजार 942 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 1068 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 1437 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | घटस्फोटानंतर राखी सावंतला करायचंय ‘या’ क्रिकेटरशी दुसरं लग्न

 

Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी गिरीश गुरुनानी यांची निवड

 

K Chandrashekar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत