Coronavirus in Maharashtra | राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्या स्थिर, गेल्या 24 तासात 6383 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर असून रुग्णांची संख्या घटल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 2 हजार 748 होती. तर गेल्या 24 तासात 2 हजार 797 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचदरम्यान 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली नाही.

 

राज्यात आज 6 हजार 383 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 81 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.82 टक्के झाले आहे. राज्यात आज 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 43 हजार 532 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 68 लाख 76 हजार 774 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 53 हजार 291 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 23 हजार 816 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 02 लाख 51 हजार 023 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 1146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 6383 patients discharge in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uday Samant On Narayan Rane | ‘टीका करून गाजावाजा करत फिरणारे, कोकणात निवडणुकीत पडतात’

 

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 10 जण ताब्यात

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी