Uday Samant On Narayan Rane | ‘टीका करून गाजावाजा करत फिरणारे, कोकणात निवडणुकीत पडतात’

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Uday Samant On Narayan Rane | भाजप आणि शिवसेनेमधील (Shivsena BJP) वाकयुद्ध काही थांबेल असं दिसत नाही. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राऊतांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. अशातच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यामध्ये उडी घेतली असून त्यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) नाव न घेता टोला लगावला आहे. (Uday Samant On Narayan Rane)

 

जे टीका करतात ते आपल्या कर्माने करतात, मी टीका करणारा मंत्री नाही आणि जे टीका करतात त्यांना उत्तरही देत बसत नाही. मात्र जे टीका करत गाजावाजा करत बसतात ते कोकणात (Konkan Election) निवडणुकीत पडतात, असं म्हणत उदय सामंत यांनी राणेंवर निशाणा साधला. पुण्यातील पिंपरी येथील आयपीएस कॅम्पसमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

 

सत्कार (Hospitality) हे दोन प्रकारचे असतात त्यातील एक म्हणजे, आदर्शवत सत्कार आणि दुसरा म्हणजे मते मिळवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करून घेतात, असं सामंत म्हणाले. त्यासोबतच त्यांनी माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येवून दाखवा, असं आव्हानही राणेंना दिलं आहे. उदय सामंत (Uday Samant) यांच्या या टीकेवर राणेंकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, माझ्या कारकीर्दीत पत्रकारांचं (Journalist) मोठं योगदान आहे. मात्र सध्या पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत.
मात्र ही आपली संस्कृती (Culture) नसून हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
जांभेकर आणि टिळक यांनी पत्रकारितेचा (Journalism) एक आदर्श घालून दिल्याचंही सामंत म्हणाले.

 

Web Title :- Uday Samant On Narayan Rane | those who go around shouting fall in the election in konkan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 10 जण ताब्यात

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 867 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी