Coronavirus In Pune City : आतापर्यंत ‘कोरोना’चे तब्बल 4001 बळी, गेल्या 24 तासात 214 नवे पॉझिटिव्ह तर 18 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे. मात्र, आतापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनामुळं तब्बल 4001 जणांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 214 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 9 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेलेल्यांची संख्या 4001 वर जाऊन पोहचली आहे. आज दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे 505 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 57 हजार 631 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 44 हजार 432 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 9 हजार 198 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 799 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 434 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.