Coronavirus : दिलासादायक ! दुसर्‍या लाटेच्या संसर्गाचा ग्राफ घसरू लागला, अनेक राज्यांमध्ये कमी होऊ लागली नवी प्रकरणे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिलासादायक बातमी आहे की, महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर अनेक राज्यांमध्ये दुसर्‍या लाटेतील संसर्गाचे आकडे कमी होऊ लागले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार संक्रमितांच्या आकड्यांचा ग्राफ अनेक राज्यांत स्थिर झाला आहे किंवा त्यांनी खालचा मार्ग धरला आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने तीन मोठी राज्य उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मागील दोन दिवसांच्या तुलनेत संसर्गाच्या नवीन प्रकरणात रविवारी घसरण नोंदली गेली आहे. दिलासादायक मोठी बातमी उत्तराखंडमधून सुद्धा आहे, येथे शनिवारच्या 8390 च्या तुलनेत रविवारी संसर्गाची 5890 नवी प्रकरणे नोंदली गेली.

छोट्या राज्यातून एका दिवसात 2500 प्रकरणांची घट मोठी गोष्ट आहे. कुंभमेळ्यादरम्यान आणि त्यानंतर येथे संसर्गाचा स्फोट झाला होता. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात सुद्धा रविवारी नवीन संक्रमितांच्या आकड्यात घसरण नोंदली गेली.

महाराष्ट्रात रविवारी कोविड-19 ची 48401 नवीन प्रकरणे समोर आली. तर 572 रूग्णांचा मृत्यू झाला. येथे बरे होण्याचा दर 86.4 टक्के आहे, तर मृत्यूदर 1.49 टक्के आहे.

कर्नाटकमध्ये कोरोनाने वाढवली चिंता, केरळात घट
केरळात एका दिवसात 6000 पेक्षा जास्त केस घटल्या आहेत. गुजरात आणि बिहारमध्ये सुद्धा असाच ट्रेंड आहे जिथे मागील दोन दिवसांपासून कोरोनाची प्रकरण कमी होत आहेत. मध्य प्रदेशात एका दिवसात घसरणीचा आकडा 550 चा आहे.

कर्नाटकमध्ये संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने चिंता वाढवली आहे. येथे रविवारी 47930 प्रकरणे समोर आली तर महाराष्ट्रात हा आकडा 48401 चा आहे. शक्यता आहे की, कर्नाटकात वाढणारी प्रकरणे महाराष्ट्राला सुद्धा मागे टाकू शकतात.