‘या’ कारणांमुळं होतो ‘कोरोना’बाधित रुग्णाचा मृत्यू

बीजिंग : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अतिसक्रिय होत असल्यामुळेच जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याचे निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहेत. शरीरात असलेले दुर्धर आजार, विविध स्वरुपाचे इन्फेक्शन या कारणांमुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो आणि त्यातून कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा अभ्यास सांगितले आहे.

फ्रंटियर्स या जर्नलमध्ये सार्वजनिक आरोग्यासंबंधीचा एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये याबाबतची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्याची शरीररचना या गोष्टी कोरोनाच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेले घटक आहेत. कोरोना विषाणूमुळे श्वसनमार्ग संक्रमित होतो, तसेच तो शरीरामध्ये वेगाने पसरतो. काही गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या शरीरात असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीला अतिसक्रिय करतो.

वैज्ञानिक संकल्पनेत त्याला साईटोकाईन स्टॉर्म असे संबोधले जाते. या परिस्थितीत पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण झपाट्याने वाढते. मोठ्या संख्येत रक्तात साइकोटाईन तयार होतात, असे संशोधन सांगते. या अभ्यासाचे लेखक आणि चीनमधील एका वैद्यकीय विद्यापीठातील प्राध्यापक दाइशुनू लियू यांनी याबाबतची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. सार्स आणि मर्सच्या फैलावासाठी हे असेत घडत असल्याचे लियू यांचे म्हणणे आहे.