थंडीच्या वातावरणात फ्लू आणि ‘कोरोना’मधील फरक कसा ओळखावा ?

दिवसेंदिवस जगभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण संख्या वाढतच आहे. सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या सहा कोटी दहा लाखांवर गेली आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ लाख ३२ हजारांवर पोहोचली आहे. भारतातही रोज संक्रमणाचे प्रकरण वाढत आहेत. वातावरणात गारवा वाढला आहे अशा स्थितीत लोकांना सामान्य फ्लू होणे ही सामान्य गोष्ट आहे. कोरोनाव्हायरस आणि सामान्य याची लक्षणे काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे वाढलेले आजार आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

साधारण फ्लू आणि कोरोना मधील फरक

दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयातील डॉक्टर संजय पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबर ते नोव्हेंबरमध्ये या कालावधीत फ्लूच्या रुग्णांची वाढ होत आहे. सामान्य लोकांना फ्लू आणि कोरोना यामधील अंतर कळणं कठीण होऊ शकत. जर फ्लूची लक्षणे घसा, खोकला, सर्दी होणे अशी लक्षणे असतील तर लवकरच तपासणी करून घ्यायला हवी. काही लोक लक्षण नसतानाही व्हायरसने संक्रमित होऊ शकतात. सध्या कोरोनाची चाचणी करण्यास सोपी असल्यामुळे तुम्ही सहज चाचणी करून घेऊ शकता. कोरोनाव्हायरसबाबत अजूनही कोणताही निश्चित डेटा मिळालेला नाही वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोणाच्या प्रसारा बाबत नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कोरोनाव्हायरसबाबत जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही इतर व्हायरस कधी येतात. किती वेळा नंतर महामारी पुन्हा येऊ शकते याबाबत आम्हाला माहिती आहे. मात्र, निश्चित डेटा उपलब्ध नाही.

पुढे ते म्हणाले, रॅपिड एंटीजन चाचणीचे रिपोर्ट्स काही मिनिटात मिळतात. आरटी पीसीआर या चाचणीत येण्यासाठी वेळ शकतो. साधारणपणेआरटी पीसीआर चाचणीचे रिपोर्ट सहा ते आठ तासांत होऊ शकतात. पीसीआर चाचणीसाठी काही ठिकाणी 24 तासांचा कालावधी लागतो.

भारतातील सर्व लोकांना लस देणे ही सरकारची पॉलिसी आहे. कधी कसं कोणाला सगळ्यात आधी लस द्यायची यावर शासनाने योजना तयार केल्या आहेत. तसेच लसीच्या किंमतीबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जेव्हा बाजारात येईल तेव्हा ती सगळ्यापर्यंत पोहोचेल यामध्ये फसवणुक होऊ शकते. सरकारचा निर्णय येईपर्यंत संयम पाळा.

ही लढाई पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेला गासूचनेचे पालन करायला हवे. त्यासाठी सगळ्यांनी शारीरिक अंतर ठेवायला हवे. सोशल डिस्टंसिंग चे नियमांचे पालन करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सरकारने दिलेले नियम नवीन नियम हे गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत. व्हायरसपासून वाचण्यासाठी नियमांचे पालन करण्यात येत आहे. सरकारने नवीन दिशा निर्देश दिले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीत उल्लेख करण्यात आला नाही. काही राज्यात नाईट कफ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले मात्र कोरोना पुन्हा वाढत असल्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.