Coronavirus : इटलीत एका दिवसात ‘कोरोना’चे 250 बळी

ADV

रोम : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या महामारीने इटलीला संपूर्ण घेरले असून येथे शुक्रवारी एकाच दिवशी २५० कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला. एका दिवसात इतक्या जणांचा मृत्यु होण्याचे ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे आता इटलीत कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या १ हजार २६६ इतकी झाली आहे. इटलीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या १७ हजार ६६० इतकी झाली आहे.

मिलन शहरात २०० ते २५० भारतीय अडकले असून त्यांना घेऊन येण्यासाठी एअर इंडिया विशेष विमान शनिवारी पाठविणार असल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ट्वीट केले आहे.

ADV

फ्रान्समध्ये ७९ जणांचा मृत्यु
फ्रान्समध्ये गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसचे शिकार झालेल्या १८ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे फ्रान्समधील कोरोनाग्रस्त मृत्युची संख्या ७९ वर गेली आहे. कोरोना व्हायरसमुळे लंडन येथील मॅरोथोन स्पर्धा ४ ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.