Coronavirus : राज्यातील ‘या’ 5 मोठ्या कारागृहात ‘लॉकडाऊन’, अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांचे आदेश

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वाढत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या पाच कारागृहात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या कारागृहामध्ये “अब कोई अंदर नही” अशी स्थिती असणार आहे. येरवडा, अर्थर रोड, भायखळा, ठाणे आणि कल्याण कारागृहासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज हे आदेश दिले आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराने देशातही उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही महाराष्ट्रात त्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस हे वाढतच चालले आहे. त्यामुळे प्रशासन हे थांबविण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. मुंबई आणि पुण्यात काही भाग सील करण्यात आले आहेत.

राज्यातील कारागृहात संख्ये पेक्षा अधिक बंदी आहेत. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन न्यायालयाने 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील विविध कारागृहातून तबल 3 हजाराहून अधिक बंदी सोडण्यात आले आहेत.

दरम्यान खबरदारी म्हणून कारागृह प्रशासनाने राज्यातील बडे कारागृह असणाऱ्या 5 कारागृहात लॉकडाऊन केले आहे. त्यात येरवडा, अर्थर रोड, भायकळा, ठाणे आणि कल्याण हे कारागृह आहेत.
आता या कारागृहात एकही बंदी या कारागृहात सोडण्यात येणार नाही. तर पोलिसांनी जवळच्या कारागृहातच त्याला दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या कारागृहातिल कर्मचारी संख्या देखील कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या कारागृहात सुरक्षित असणार आहे.