Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस कोणं, कुठं अन् कसा तयार केला ?, धक्कादायक माहिती उजेडात

बीजिंग : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूने जगभरात धुमाकुळ घातला आहे. या महाभयंकर विषाणूने आतापर्यंत सात लाखांपेक्षा अधिक जणांचा बळी घेतला आहे. जगभरात कोट्यावधी लोकांना संक्रमीत करणारा हा विषाणू कोणी आणि कोठे तयार केला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता व तो सध्या चिनी लष्कराच्या ताब्यात आहे. हा व्हायरस तयार करण्यात केवळ चीनच्याच नाही तर फ्रेंच आणि अमेरिकन शास्त्रज्ञांचाही सहभाग होता, अशी माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरस हा नैसर्गिकरीत्या तयार झालेला नसून, तो वुहानमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता, असा संशय काही महिन्यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चीनच्या बाजूनं असणाऱ्यांकडून याचा इन्कार करण्यात आला होता. मात्र, आता नवीन माहिती समोर आल्यामुळे चीनचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आला आहे.

कोरोना व्हायरस चीननेच तयार केला व जगभर फैलावला, त्याला पुष्टी देणारे संशोधन युनेस्कोच्या नेतृत्वाखालील पॅरिस येथील स्वयंसेवी संस्थेने जारी केले आहे. 1997 मध्ये स्थापन केलेल्या या वर्ल्ड अकॅडमी ऑफ बायोमेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीजचे (WABT) संस्थाध्यक्ष जोसेफ ट्रिटो (वय-68) यांनी पुरेशी कागदपत्रे, तारखा, तथ्ये आणि नावांनिशी हा प्रबंध सादर केला आहे.