Coronavirus : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर 31 मार्चपर्यंत बंद ! सरकारी कार्यालयातील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार : CM उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वर पोहचला आहे. रूग्णांच्या संख्यत वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना काळजी देखील वाटत आहे. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील लोकल आणि बससेवा सुरूच राहतील असे सांगितलं आहे.

जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता राज्यात इतर सर्व काही 31 मार्च पर्यंत बंद असणार आहे. राज्यातील सरकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांची उपस्थिती 25 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.
बससेवा आणि रेल्वे या शहराच्या लाईफलाईन आहेत. त्या बंद करणं सोपी गोष्ट नाही.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनासाठी जनजागृती करणार्‍या बॉलिवूडमधील कलाकारांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. विशेष करून त्यांनी रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन यांच्यासह इतर दिग्गजांचे आभार मानले. दरम्यान, 31 मार्चपर्यंत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर हे शहरं बंद असणार आहेत.