कोरोनाशी लढा : हात धुण्यासाठी ‘या’ शहरात ठिकठिकाणी ठेवणार ‘या’ 3 वस्तू, दिले ‘हे’ 8 निर्देश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतात कोरोना व्हायरसमुळे दोनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 150 पेक्षा जास्त झाली आहे. 13 रूग्ण बरे झाले आहेत आणि 102 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी दिल्लीत विविध भागात पोर्टेबल हँडवॉश स्टेशन लावण्याचे निर्देश दिले आहेत.

केजरीवालांनी दिले हे निर्देश

1. सर्व एमसीडी कमिशनर आणि एसडीएम यांनी सर्व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येन साबण आणि         पाणी (मोबाईल वॉश बेसिन) ची व्यवस्था करावी. यामुळे लोकांना सतत हात धुणे सोपे जाईल.

2. आपल्या भागात किती मोबाईल वॉश बेसिन लावायचे याचे सर्व कमिश्नरला टार्गेट.

3. मोबाइल वॉश बेसिनसह जिथे-जिथे शक्य आहे तेथे तैनात सुरक्षारक्षकांकडे हँडसॅनिटायजरची व्यवस्था      करण्यात येईल. लोक त्यांच्याकडून घेऊन वापर करतील.

4. दिल्ली सरकार जरूरी पावले उचलत आहे, जनतेने सहकार्य करावे.

5. गर्दी करू नका. लग्नसोहळा वगळता 50 लोक एकत्र जमाणार्‍या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी            नाही.

6. लोकांनी लग्नसोहळेत सुद्धा टाळावेत.

7. सरकारी, खासगी कार्यालये, शॉपिंग मॉलसह सर्व सार्वजनिक स्थळांना संसर्गरहित करणे अनिवार्य.

8. दिल्लीत कोरोना व्हायरस महामारी घोषित.