Coronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना ‘कोरोना’ची ‘लागण’, पोलिसांनी दाखल गेला ‘गुन्हा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारने देशात 21 दिवसाचे लॉकडाउन जाहीर केले आहे. सरकार सतत सोशल डिस्टेंसिंगचा सल्ला देत आहे. तथापि, काही लोक हे स्वीकारत नाहीत, त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. अशीच एक घटना गुजरातमधील गांधीनगरमधून समोर आली आहे, जिथे सोशल डिस्टेंसिंग आणि क्वारंटाईन मध्ये न राहिल्याने 9 लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागला आहे.

गांधीनगरचा रहिवासी असलेला एक बिल्डर अलीकडेच दुबईहून गांधीनगरला परतला. सरकारकडून वारंवार आवाहन करूनही तो क्वारंटाईन मध्ये राहिला नाही. परिणामी, त्याने आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांना देखील कोरोनाचे रुग्ण बनवले, ज्यात त्याची पत्नी, आई, आजोबा आणि आजी यांचा समावेश आहे. हा बिल्डर त्याच्या काकालाही भेटला होता, त्यामुळे त्याच्या काकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

यानंतर, बिल्डरचे काका जे फार्मासिस्ट आहेत, ते त्यांच्या कुटूंबाच्या संपर्कात आले आणि पत्नी आणि कुटुंबीयांना कोरोनाचे रुग्ण बनविले. या सर्वांचा कोरोना तपासणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. बिल्डरचे काका गांधीनगरमध्ये फार्मासिस्ट असूनही त्यांना कोरोनाबद्दल सतर्क राहता आले नाही. ते स्वतः कोरोनाच्या विळख्यात अडकले आणि आपल्या कुटूंबालाही सोबत नेले.

एवढेच नाही तर बिल्डरचे काका गांधीनगरच्या वेडा गावच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि मल्टीपर्पज वर्क अधिकारी यांच्या संपर्कातही आले होते. यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दोघांचा चाचणी अहवालही सकारात्मक आला आहे. असे सांगितले जात आहे की वैद्यकीय अधिकारी जे सकारात्मक आढळले आहेत, ते देखील बर्‍याच लोकांच्या संपर्कात आले. तसेच बिल्डरच्या काकाला भेटल्यानंतर त्याने बर्‍याच जणांची तपासणी केली होती. अशा परिस्थितीत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती आहे.

आता वैद्यकीय अधिकाऱ्याकडे औषध घेण्यासाठी गेलेल्या त्या सर्व लोकांची सरकार चौकशी करीत आहे. या सर्व लोकांना क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगितले गेले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी त्या बिल्डर विरूद्ध दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील नागरिकांना लॉकडाउन काटेकोरपणे पाळण्यास सांगितले जात आहे. त्याच वेळी, भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 1020 पेक्षा जास्त झाली आहे, त्यापैकी 27 लोकांचा मृत्यू झाला आहे.

You might also like