Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 38310 नवे पॉझिटिव्ह, अ‍ॅक्टीव्ह केसेस साडे सात लाखांपेक्षा कमी

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या लागोपाठ कमी होताना दिसत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मंगळवारी जारी आकड्यांनुसार, मागील 24 तासात कोरोनाचे 38 हजार 310 नवे रुग्ण सापडले आहेत आणि 490 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 58 हजार 524 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोविड-19 संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 23 हजार 97 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 76 लाख 3 हजार 121 लोक बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट सुद्धा 1% वाढीसह 92% झाला आहे.

देशात 6.86% अ‍ॅक्टिव्ह केस, महाराष्ट्रात जास्त संख्या
देशात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केस (अशा रुग्णांची संख्या ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत) कमी होऊन 5 लाख 41 हजार 405 राहिली आहे. ही एकूण संक्रमितांच्या 6.86% आहे. दोन महिन्यांत यामध्ये सतत घसरण नोंदली जात आहे. आता सर्वात जास्त 22.47% अ‍ॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. मात्र, यामध्ये सुद्धा लागोपाठ घसरण होत आहे. दुसर्‍या नंबरवर केरळ आहे, जेथे 15.57% आणि नंतर कर्नाटकमध्ये 9.08% रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वात कमी दादरा आणि नागरा हवेली, अंदमान-निकोबार आणि सिक्किममध्ये अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.

ADV

टेस्टिंगचा आकडा 11 कोटींच्या पुढे
देशात कोरोनाच्या नव्या प्रकरणात घट होत आहे. टेस्टिंगचा आकडा 11 कोटींच्या पुढे गेला आहे. यावेळी एक कोटी टेस्टिंगवर केवळ 4.70 लाख रुग्ण सापडले आहेत, जे सर्वात कमी आहेत. एक ते दोन कोटी टेस्टिंगच्या दरम्यान 10.84 लाख रूग्ण सापडले होते, जे सर्वात जास्त होते.

महाराष्ट्रात सापडले 4009 नवे रुग्ण
महाराष्ट्रात सोमवारी 4009 नवे संक्रमित सापडले. 10225 लोक रिकव्हर झाले आणि 104 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 16 लाख 87 हजार 784 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 लाख 18 हजार 777 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 15 लाख 24 हजार 304 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 44 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.